India National Cricket team vs Australia National Cricket Team:   ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (IND vs AUS) दुसरा सामना 06 डिसेंबर (शुक्रवार) पासून ॲडलेड येथील ॲडलेड ओव्हल (Adelaide Oval) येथे खेळवला जात आहे. टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हातात आहे. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. दरम्यान, प्रत्युत्तरात पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियने 10 विकेट गमावून 337 धावा केल्या आहे. यासह त्यांनी भारताविरुद्ध 157 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेडने सर्वाधिक 140 धावांची सर्वाधिक खेळी केली. तर भारताकडून सिराज आणि बुमराहने प्रत्येकी 4-4 विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या भारताने आपल्या सलामीच्या फलंदाजांच्या विकेट्स लवकर गमावल्यानंतर विराट कोहलीही लवकर बाद झाल्यानंतर भारताला मोठा धक्का बसला आहे.  विराट कोहलीने 21 चेंडूत 11 धावा केल्या. भारताची धावसंख्या सध्या 15 षटकानंतर  3 बाद 73 अशी आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)