टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना (WTC Final 2023) खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर खेळला जात आहे. पाचव्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने दुसऱ्या डावात 40 षटकात तीन गडी गमावून 164 धावा केल्या होत्या. याआधी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 121.3 षटकांत 449 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 163 धावा केल्या. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याचवेळी, पहिल्या डावात टीम इंडिया 69.4 षटकात केवळ 296 धावा करत ऑलआऊट झाली. टीम इंडियाकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 89 धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. तत्पूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने पॅट कमिन्सची विकेट पडताच 270 धावांवर डाव घोषित केला. आता टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 444 धावांची गरज आहे. दुसऱ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला नववा मोठा झटका बसला. टीम इंडियाचा स्कोर 228/9.
WTC FINAL. WICKET! 61.5: Srikar Bharat 23(41) ct & b Nathan Lyon, India 224/9 https://t.co/0nYl21pwaw #WTC23
— BCCI (@BCCI) June 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)