IND W vs AUS W 1st ODI: ऑस्ट्रेलियाच्या उत्कृष्ट फलंदाजीसमोर भारतीय महिला संघाची गोलंदाजी अपयशी ठरली आहे. त्यामुळे सन्मानजनक धावसंख्या उभारूनही भारताने हा सामना 6 विकेटने गमावला.फोबी लिचफिल्ड (78), एलिस पेरी (75), बेथ मुनी (42), ताहलिया मॅकग्रा (68) यांनी संघाला विजय मिळवून दिला. जेमिमा रॉड्रिग्जच्या 82 धावांच्या शानदार खेळी आणि पूजा वस्त्राकरच्या नाबाद 62 धावांच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या महिला एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात पहिल्या डावात आठ गडी गमावून 282 धावा केल्या. या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यातही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची मागील सर्वोत्तम धावसंख्या 2017 मध्ये डर्बीमध्ये चार विकेट्सवर 281 धावा होती. (हे देखील वाचा: South Africa Beat India: पहिल्या कसोटीत भारताचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव, मालिकेत दक्षिण आफ्रिकेने घेतली 1-0 अशी अभेद्य आघाडी)
Australia win the 1st ODI by 6 wickets.#TeamIndia will aim to bounce back in the next game 🙌
Scorecard ▶️ https://t.co/MDbv7Rm75J#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/BeoV1pOidJ
— BCCI Women (@BCCIWomen) December 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)