RCB vs DC, IPL 2024: अक्षर पटेल करणार दिल्ली संघांचे नेतृत्व, रिकी पाँटिंग यांनी दिला दुजोरा
स्लो ओव्हर रेटमुळे दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार ऋषभ पंतला (Rishabh Pant) एका सामन्यातून बाहेर बसावे लागणार आहे. अशा स्थितीत अक्षर पटेल (Axar Patel) आता त्याच्या जागी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
RCB vs DC, IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या 62 व्या सामन्यात रविवारी दिल्ली कॅपिटल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (DC vs RCB) होणार आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यापूर्वी एक मोठा अपडेट समोर आला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार ऋषभ पंतला (Rishabh Pant) एका सामन्यातून बाहेर बसावे लागणार आहे. अशा स्थितीत अक्षर पटेल (Axar Patel) आता त्याच्या जागी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी याला दुजोरा दिला आहे. (हे देखील वाचा: IPL Playoff Scenario: चेन्नईच्या पराभवाने 'या' संघांच्या आशा उंचावल्या, आरसीबी-गुजरातही शर्यतीत कायम)
Ricky Ponting confirms that Axar Patel will lead the team against RCB tomorrow 🚨#IPL2024 #RishabhPant #RCBvsDC pic.twitter.com/0FPThIWL0O
— OneCricket (@OneCricketApp) May 11, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 11, 2024 07:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

