एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये (ICC World Cup 2023) जर कोणत्याही संघाने आपल्या खेळाने सर्वाधिक विजय मिळवला असेल तर तो अफगाणिस्तान संघ आहे. अफगाणिस्तानच्या संघाला जरी उपांत्य फेरीत मजल मारता आली नसली तरी या स्पर्धेत त्यांनी पाकिस्तान आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांना नक्कीच पराभूत केले. दरम्यान, अफगाणिस्तानचा खेळाडू रहमानउल्ला गुरबाजने (Rahmanullah Gurbaz) दिवाळीच्या एक रात्री अहमदाबादमधील डझनभर गरजू लोकांना पैसे वाटून मदत केली. गुरबाज पैसे वाटतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. गुरबाज अहमदाबादमध्ये रस्त्याच्या कडेला झोपलेल्या काही लोकांकडे गेला आणि त्यांनाही दिवाळी साजरी करता यावी म्हणून त्यांना पैसे दिले. गुरबाजच्या या पावलाचे खूप कौतुक होत आहे. (हे देखील वाचा: Most Sixes in a Calendar Year in ODI: रोहित शर्माचा नवीन विक्रम, वनडेमध्ये एका कॅलेंडर वर्षात ठोकले सर्वाधिक षटकार)
पाहा व्हिडिओ
Rahmanullah Gurbaz silently gave money to the needy people on the streets of Ahmedabad so they could celebrate Diwali.
- A beautiful gesture by Gurbaz. pic.twitter.com/6HY1TqjHg4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)