Most Sixes in a Calendar Year in ODI: रोहित शर्माचा नवीन विक्रम, वनडेमध्ये एका कॅलेंडर वर्षात ठोकले सर्वाधिक षटकार

2023 विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील हा शेवटचा सामना आहे. देशाला दिवाळी भेट देण्याच्या इराद्याने टीम इंडिया आज मैदानात उतरली आहे. टीम इंडियाला लीग टप्प्यातील सर्व 9 सामने जिंकून सेमीफायनल खेळायला आवडेल.

Most Sixes in a Calendar Year in ODI: रोहित शर्माचा नवीन विक्रम, वनडेमध्ये एका कॅलेंडर वर्षात ठोकले सर्वाधिक षटकार
Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

दिवाळीच्या मुहूर्तावर टीम इंडिया आणि नेदरलँड्स (IND vs NED) यांच्यातील हा सामना बंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. 2023 विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील हा शेवटचा सामना आहे. देशाला दिवाळी भेट देण्याच्या इराद्याने टीम इंडिया आज मैदानात उतरली आहे. टीम इंडियाला लीग टप्प्यातील सर्व 9 सामने जिंकून सेमीफायनल खेळायला आवडेल. दरम्यान, टीम इंडियाच्या रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा दमदार अर्धशतक पूर्ण केले आहे तसेच त्याने नव्या विक्रमाला गवसनी घातली आहे. रोहित शर्माने एबी डिव्हिलियर्स मागे टाकून वनडेमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार ठोकले आहे. एबी डिव्हिलियर्स 58 तर रोहित शर्मा 59 षटकार लगावले आहे. (हे देखील वाचा: IND vs NED ICC World Cup 2023: रोहित शर्माचा मोठा पराक्रम, सलामीवीर म्हणून आंतराष्टीय क्रिकेटमध्ये 14,000 धावा केल्या पूर्ण)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 12, 2023 03:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).