IND vs SA 2nd Test Day 2: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दुसरा कसोटी सामना केपटाऊन येथील न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. पहिला दिवशी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 3 गडी गमावून 62 धावांवर आटोपला. आणि 36 धावांनी मागे आहे. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतासमोर किती धावांचे लक्ष्य ठेवतो हे पाहणे विशेष ठरणार आहे. पहिल्या दिवशी दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात केवळ 55 धावांवर बाद झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने 6 विकेट घेतल्या. मात्र, भारतीय संघही पहिल्या दिवशी 153 धावांतच ऑलआऊट झाला. दमदार सुरुवातीनंतर संघाची मोठी धावसंख्या हुकली. एकवेळ भारताच्या 153 धावांत 4 विकेट्स होत्या. मात्र लुंगी अँगिडीच्या चेंडूवर केएल राहुलने खराब शॉट खेळून आपली विकेट गमावली. त्यानंतर पुढच्या 11 चेंडूत कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडीने संपूर्ण संघ 153 धावांवर आटोपला. अशा स्थितीत तुम्ही दुसऱ्या दिवसाच्या खेळाचा मोफत आनंद घेऊ शकता. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे आणि डिस्ने + हॉटस्टार अॅपवर विनामूल्य पाहता येईल.
After an eventful first day, Day 2 unfolds with the question: Will India triumph and make the series square? 🏏
Tune-in to Day 2 of #SAvIND 2nd Test
Today, 12:30 PM | Star Sports Network#Cricket pic.twitter.com/qBLfKlRM8a
— Star Sports (@StarSportsIndia) January 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)