Viral Video: आजकाल क्षुल्लक गोष्टीवरून गोळीबार, खून यांसारख्या गंभीर घटना घडत आहेत. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक ताजे प्रकरण समोर आले आहे. येथे किरकोळ वादातून काका-पुतण्यावर गोळीबार करण्यात आला आहे. एकीकडे मध्य प्रदेशात गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील असलेल्यांवर 'बुलडोझर' कारवाई केली जात आहे, मात्र असे असतानाही गुन्हेगारांचे मनोधैर्य उंचावलेले आहे. याचे ताजे उदाहरण ग्वाल्हेरमधून पाहायला मिळाले. येथे क्षुल्लक कारणावरून काही लोक हॉटेलमध्ये घुसले. हा वाद इतका वाढला की, तरुणांनी गोळीबार केला. या गोळीबारात एकाला गोळी लागली तर दुसरा जखमी झाला. जखमी व्यक्तीचा भाचा भांडणात मध्यस्थी करण्यासाठी आला असता तोही जखमी झाला. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मारामारीचा आणि गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)