IND vs BAN 2nd T20I: भारत आणि बांगलादेशचे (IND vs BAN) संघ बुधवारी दुसऱ्या टी-20 सामन्यात आमनेसामने आले. या सामन्यात नितीश रेड्डी आणि रिंकू सिंग यांची स्फोटक खेळी पाहायला मिळाली, तर क्षेत्ररक्षण करताना हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आश्चर्यकारक झेल घेतला. हा झेल टिपण्यासाठी हार्दिक पंड्या 27 मीटर धावला बांगलादेशच्या डावाच्या 14व्या षटकात वरूण चक्रवर्ती गोलंदाजी करत होता, या षटकातील तिसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता, बांगलादेशचा फलंदाज रिशाद हुसेनने या चेंडूवर एरियल स्वीप केला, हा चेंडू मिड-विकेटच्या दिशेने गेला. हा झेल टिपण्यासाठी हार्दिक पांड्या डाव्या बाजूने धावला. त्याने एक लांब मैदान कव्हर केले आणि सुमारे 27 मीटर धावला आणि डायव्हिंग करून झेल घेतला. हा झेल घेताना हार्दिक पांड्या जमिनीवर पडला, मात्र त्याने शरीराचा समतोल साधत हा झेल जमिनीवर पडू दिला नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)