मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, ज्यामुळे ग्राहक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. ग्वाल्हेरच्या आनंद नगरमध्ये येथे एका एका दहा वर्षांच्या मुलाला अंघोळ करत असताना साबणामधील ब्लेडमुळे जखम झाली आहे. अहवालानुसार, वडील अंगद सिंग तोमर यांनी 21 मे रोजी जवळच्या दुकानातून लोकप्रिय कंपनीचे साबण खरेदी केले होते. सोमवारी संध्याकाळी, त्यांचा 10 वर्षांचा मुलगा अंश या साबणाने आंघोळ करत असताना अचानक साबणाच्या आतून एक ब्लेड बाहेर आले, ज्यामुळे मुलाच्या चेहऱ्यावर जखम झाली. मुलाने वडिलांना याची माहिती दिली असता साबणामध्ये ब्लेड आढळल्याचे पाहून त्यांनाही धक्का बसला. त्यानंतर वडील अंगद तोमर यांनी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर या साबणाबद्दल तक्रार केली. अंगद यांनी याबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे. गरज पडल्यास प्रकरण न्यायालयात नेण्याचा इशारा दिला आहे. कुटुंबाने स्थानिक पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्याचा विचार केला आहे, पण प्रथम ते ग्राहक मंचाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. त्यांनी कंपनीकडून नुकसानभरपाई आणि उत्पादनाची तपासणी करण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा: Chitale Bandhu Worm Controversy: चितळे बंधू मिठाईवाले यांच्या ढोकळा पाकिटात जिवंत अळी; व्हिडिओ व्हायरल)

लोकप्रिय कंपनीच्या साबणात आढळले ब्लेड:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)