Harshit Rana: टीम इंडिया हैदराबादमध्ये बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या सामन्यापूर्वी एक महत्त्वाचा अपडेट दिला आहे. हर्षित राणाच्या पदार्पणाची चर्चा होती. मात्र तो निवडीसाठी उपलब्ध नव्हता. हर्षित राणा आजारी पडला आहे. तो टीम इंडियासोबत स्टेडियममध्ये येऊ शकला नाही. हर्षित राणा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. देशांतर्गत सामन्यांमध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे. यासोबतच त्याने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच हर्षितला टीम इंडियात स्थान मिळाले. तो पदार्पणही करणार होता. पण आजारपणामुळे त्याला तिसऱ्या टी-20 साठी संधी मिळाली नाही. हर्षित राणा हा व्हायरल इन्फेक्शनचा बळी ठरला आहे. राणाची तब्येत इतकी बिघडली आहे की ते स्टेडियममध्येही येऊ शकले नाहीत.
UPDATE: Mr. Harshit Rana was unavailable for selection for the third T20I due to a viral infection and did not travel with the team to the stadium.#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) October 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)