Woman Enters Delhi Bus Wearing A Bikini: दिल्ली मेट्रोमध्ये याआधी अनेक आक्षेपार्ह वर्तनाचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे दिल्ली मेट्रोवरही बरीच टीकाही झाली आहे. आता आता डीटीसी बसमध्येही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो डीटीसी बसचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये एक महिला अर्धनग्न अवस्थेत बसमध्ये चढलेली दिसत आहे. महिलेने फक्त बिकिनी घातली आहे. बसमध्ये या महिलेला पाहून इतर प्रवाशांची मान शरमेने खाली गेली. यानंतर हळूहळू तिथे बसलेले लोक निघून जातात आणि बस रिकामी होते. यावेळी बसमधील कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट करून व्हायरल केला.

मात्र ही बस नक्की कोणत्या मार्गावर धावत होती हे अद्याप समजू शकलेले नाही, तसेच या व्हिडिओला डीटीसीकडूनही अद्याप दुजोरा मिळालेला नाही. फक्त अंतर्वस्त्र परिधान करून बसमध्ये चढलेल्या महिलेचा हेतू काय होता? हेही स्पष्ट झालेले नाही. या व्हिडिओवर अनेक यूजर्सनी आश्चर्य व्यक्त केले आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी किती काळ उपाययोजना राबविणार, असा सवालही वापरकर्त्यांनी केला आहे. (हेही वाचा: Telangana School Vandalised: भगव्या कपड्यांवर शिक्षकांना कथित आक्षेप, विद्यार्थ्यांकडून शालेय आवारात तोडफोड; तेलंगणातील घटना)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)