Telangana School Vandalised | (Photo Credit: X)

'हनुमान दीक्षा पोशाख' परिधान करुन आलेल्या काही विद्यार्थ्यांना वर्गात कथितरित्या प्रवेश नाकारल्यानंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्याच्या एका गटाने शालेय आवारात तोडफोड (Telangana School Vandalised) केल्याचे वृत्त आहे. ही घटना तेलंगणा राज्यातील मंचेरियल जिल्ह्यातील मदर तेरेसा शाळेत घडल्याचे समजते. सांगितले जात आहे की, काही विद्यार्थी 'हनुमान दीक्षा पोशाख' परिधान करुन शाळेत आले होते. या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश करायचा होता. मात्र, शाळेतील शिक्षकांनी त्यास आक्षेप घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आणि त्यानी बेकायदेशीर कृत्य केले. दरम्यान, घडलेला प्रकार नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

 शालेय प्रशानाविरोधात गुन्हा दाखल

प्राप्त माहितीनुसार, 21 दिवस पाळल्या जाणाऱ्या विशेष धार्मिक कार्याचा भाग म्हणून सदर विद्यार्थी विशिष्ट पोशाख परिधान करु आले होते. या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी प्रवश नाकारला होता. त्यामुळे विद्यार्थी संतापले आणि शालेय अवारात अनुचित प्रकार घडला. दरम्यान, विद्यार्थी आणि पालकांनी दिलेल्या तक्रारीवरुन शालेय प्रशानाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शाळेचे संचालक, मुख्याध्यापक आणि काही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांविरोधात कलम 153 (ए) (धर्म किंवा वंशाच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) आणि 295 (अ) (धार्मिक भावना दुखावने) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

शालेय व्यवस्थापनाकडून आरोपांचे खंडण

दुसऱ्या बाजूला, शालेय व्यवस्थापनाने आपल्यावरील आरोपांचा प्रतिवाद केला आहे. आरोपांचे खंडण करताना शाळेने म्हटले आहे की, मानक असलेला शालेय गणवेश न धारण करता काही विद्यार्थी वेगला पोषाख घालून आले. याबाबत त्यांनी तसे करु नये असे अवाहन मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच, विद्यार्थ्यांचे वर्तन त्यांच्या पालकांच्याही कानावर घातली. मात्र, विद्यार्थी आणि पालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी त्यांनी शालेय प्रवेशाचा हट्ट धरला आणि शाळेच्या फाटकावर निदर्शने केली. निदर्शकांनी जबरदस्तीने शाळेच्या आवारात घुसून खिडक्या आणि फुलांच्या कुंड्यांसह मालमत्तेची तोडफोड केल्याचे शालेय प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, या प्रकाराची दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

व्हिडिओ

दरम्यान, शालेय व्यवस्थापनानेही स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून अद्याप कोणालाही अटक झाली नाही. प्रकरण गंभीर असल्याने याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे.