Viral Video: मुलाला घेऊन जाताना महिलेला मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक माणूस आपल्या मुलाला हातात घेऊन जात असलेल्या महिलेला आक्रमकपणे मारताना दिसत आहे. वसई परिसरातून हा व्हिडिओ समोर आला आहे. ही व्यक्ती महिलेला का मारत होता, हे अद्याप समजू शकलेले नाही. वसई रोडच्या स्टेशन परिसरात बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या व्यक्तीने महिलेचे केस किमान चार वेळा पकडले आणि तिला मारहाण केली. (हेही वाचा - Viral Video: इंदूरमध्ये लिफ्ट बंद पडल्याने आई आणि मूल अडकले; पोलिसांनी त्वरित प्रतिसाद देऊन केली सुटका, Watch Video)
मुंबई: वसई के भर स्ट्रीट पर एक महिला की पिटाई, CCTV में कैद हुई पूरी घटना#Mumbai #CCTVFootage #Women #Beaten pic.twitter.com/6YcpWgBhdM
— India TV (@indiatvnews) July 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)