Mumbai Local Mega Block: पश्चिम रेल्वेकडून 3 ऑगस्टला रात्री वसई रोड ते भाईंदर दरम्यान मेगाब्लॉक; जाणून घ्या लोकलच्या वेळेत होणारे बदल

ब्लॉक कालावधीत, विरार/वसई रोड ते बोरिवली/गोरेगाव स्थानकादरम्यान सर्व धिम्या मार्गावरील गाड्या या जलद मार्गावर चालवल्या जातील.

Mumbai Local Mega Block: पश्चिम रेल्वेकडून 3 ऑगस्टला रात्री वसई रोड ते भाईंदर दरम्यान मेगाब्लॉक; जाणून घ्या लोकलच्या वेळेत होणारे बदल
Mumbai Local | (Photo Credit - Twitter)

Mumbai Local Mega Block: ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांची देखभाल करण्यासाठी, वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर शनिवार/रविवारच्या मध्यरात्री 00.30 ते 04.00 वाजेपर्यंत, म्हणजे 03/04 ऑगस्ट रोजी जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे.पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ब्लॉक कालावधीत, विरार/वसई रोड ते बोरिवली/गोरेगाव स्थानकादरम्यान सर्व धिम्या मार्गावरील गाड्या या जलद मार्गावर चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत, काही अप आणि डाऊन उपनगरीय गाड्या रद्द राहतील. याबाबतची सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टर्सकडे उपलब्ध आहे. प्रवाशांनी वरील व्यवस्थेची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच यामुळे, रविवार, 04 ऑगस्ट, 2024 रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरी विभागात दिवसाच्या वेळेत कोणताही ब्लॉक असणार नाही. (हेही वाचा: Thane Hoarding Collapsed: कल्याण येथील सहजानंद येथे होर्डिंग कोसळलं, कोणतीही जीवितहानी नाही, 3 वाहनांचे नुकसान)

पहा पोस्ट-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 02, 2024 10:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).