महाराष्ट्रामध्ये आता अनेक ठिकाणी विमानसेवा सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातही आणि महाराष्ट्र ते गोवा दरम्यानही अनेक जण रस्ते, ट्रेन ऐवजी विमानांचा पर्याय निवडतात. स्पाईसजेटच्या पुणे-गोवा विमानामध्ये को पायलट कडून चक्क मराठीतील सूचना ऐकून प्रवासी देखील चकित झाले होते. सोशल मिडीयातही अनेकांनी हा व्हीडिओ शेअर करत अशाप्रकारे उद्घोषणा झाल्या पाहिजेत अशी भावना बोलून दाखवली आहे.
स्पाईस जेट #SpiceJet विमानाची सह विमानचालिका संजना अमृते यांनी पुणे ते गोवा यात्रेदरम्यान केली मराठीत उद्घोषणा 🗣️
महाराष्ट्रातुन उडणाऱ्या व इथे येणाऱ्या सर्व विमानात प्रथम #मराठीत उद्घोषणा झाल्या पाहिजेत.@JM_Scindia@AAI_Official
राज्य मराठी ! भाषा मराठी
खूप आभार @flyspicejet pic.twitter.com/IP5w2GfAPK
— मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) September 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)