बुलढाणा येथील एका एटीएममध्ये धक्कादायक घटना घडली. ज्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटना अशी की, एका एटीएममध्ये चक्क पैशांऐवजी सापच बाहेर आला. होय, एक ग्राहक एटीएममध्ये पैसै काढायला गेला असता एटीएममधून साप निघाला. अर्थात, हा साप बाहेरुन कुठून तरी एटीएममध्ये शिरला असावा हे निश्चित. बुलडाण्यातील मोताळा येथील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये ही घटना घडली. सापला पाहून एटीएममध्ये आलेल्या ग्राहकाची चांगलीच घाबरगुंडी उडाली. दरम्यान, सर्पमित्रांनी सापाला पकडून जंगलात सोडल्याचे समजते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)