हैदराबाद येथील रिअल इस्टेट व्यापारी मोहम्मद तारिक अली कादरी उर्फ बाबा खान (40) यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. लेटेस्टलीच्या वाचकांसाठी सूचना अशी की, हा व्हिडिओ आपले लक्ष विचलीत करु शकतो. व्हिडिओमध्ये पाहायला मिळत की, हैदराबाद येथील IS सदन पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या रामचंद्र नगरमध्ये चाकू, विळा आणि इतर धारदार शस्त्रांसह हल्ल्याच्या तयारीत असलेल्या एका टोळक्याने खान यांच्यावर हल्ला केला. ज्यामध्ये खान यांचा मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असावी असा प्राथमिक संशय आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

दुसऱ्या बाजूला, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून त्याच्या अधारे तपास सुरु केला आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)