Shinde-Thackeray Marriage Invitation Card: महाराष्ट्राच्या राजकारण सध्या दसरा मेळाव्यावरून चांगलचं तापलेलं पाहायला मिळालं. शिवसेनेचं दोन गटात विभाजन झाल्यानंतर शिंदे-ठाकरे गट एकमेकांवर निशाणा साधत आहेत. अशातचं आता सोशल मीडियावर ठाकरे आणि शिंदे कुटुंबियातील विवाह सोहळ्याची चर्चा जोर धरू लागली आहे. होय. सोशल मीडियावर ठाकरे आणि शिंदे कुटुंबियाची लग्नपत्रिका व्हायरल झाली आहे. ही लग्नपत्रिका पाहून सर्वांनाचं धक्का बसला आहे. पण, ही लग्नपत्रिका जुन्नर तालुक्यातील आहे.

प्राप्त माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील वडगाव सहाणी गावचे शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आणि सरपंच तसेच निष्ठावंत शिवसैनिक खंडेराव विश्राम शिंदे यांचे पुतणे चिंरजीव विशाल आणि आंबेगाव तालुक्यातील साल गावच्या ठाकरे परिवाराची सुकन्या अनुराधा यांचा शुभविवाह 8 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. या लग्नपत्रिकाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)