Shark Attack in Florida: फ्लोरिडा (Florida) च्या पूर्व किनाऱ्यावर शार्कच्या हल्ल्यात (Shark Attack) शुक्रवारी एक मच्छीमार (Fisherman) गंभीर जखमी झाला. शार्कने या व्यक्तीच्या उजव्या हाताला गंभीर चावा घेतला. स्थानिक वेळेनुसार सकाळी 11:15 च्या सुमारास नासाऊ काउंटी शेरीफचे कार्यालय सागरी युनिट गस्त घालत असताना अधिकाऱ्यांना एका बोटीतून त्रासदायक कॉल आला. यावेळी मच्छीमाराच्या हातातून गंभीर रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर पीडित व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

पहा फोटो -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)