उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद मध्ये सीमा हैदर सारखं एक प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये एक इराणी महिला भारतामध्ये आली आहे. फेसबूक च्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून भारतीय व्यक्तीशी विवाह करण्यासाठी ती देशात आली. इराणी महिलेचे नाव Faiza आहे. Diwakar Kumar या युट्युबरशी लग्न करण्यासाठी ती भारतामध्ये आली आहे. नुकताच त्यांचा साखरपुडा संपन्न झाला असून त्यांच्या या सोहळ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीया मध्ये वायरल झाला आहे. फेसबूक च्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली नंतर दिवाकर फैझाला भेटण्यासाठी इराणला गेला. त्यांनी रिलेशनशीप बद्दल कुटुंबियांना सांगितलं आणि ते लग्नाला तयार झाले. लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)