सोशल मीडियावर नुकताच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोन माणसे सापाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एका फ्लॅटच्या खिडकीला संरक्षक लोखंडी जाळी लावलेली दिसते व त्यात एक विशाल अजगर लटकलेला आहे. व्हिडिओमध्ये, एक माणूस सापाच्या शेपटीने तर दुसरा सापाचे डोके धरून त्याला ग्रीलमधून सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. सरतेशेवटी, अजगर जाळीवरील आपली पकड सोडतो आणि त्यावरून खाली पडतो. सध्या सोशल मीडियावर फिरत असलेली ही क्लिप महाराष्ट्रातील ठाण्यातील असल्याचे दावे केले जात आहेत. मात्र, ही घटना नक्की कुठे घडली याचा ठावठिकाणा अद्याप समजू शकलेला नाही. (हेही वाचा: Delhi Male-Female Fight Video: हरवलेल्या कुत्र्याचे पोस्टर फाडले, चिडलेल्या महिलेकडून परुषाला कॉलर पकडून मारहाण, व्हिडिओ व्हायरल)

Men Rescuing Giant Snake Crawling Flat Window- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)