देशभरातील विविध राज्यात पाऊस धोधो कोसळत आहे. गेल्या काही दिवसात मध्य प्रदेशातही (Madhya Pradesh) पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील विविध भागात पूरसदृश्य (Flood) परिस्थिती निर्माण झाली असुन विविध गावांना पुराच्या पाण्याने विळखा घातला आहे. बेतूल जिल्ह्यातील अनेक गावखेड्यामध्ये पाणी शिरलं आहे. तरी गावखेड्यात आवश्यक त्या वैद्यकीय सोयी उपलब्ध नसल्याने एका गर्भवती महिलेला पूराच्या पाण्यातून खाटेवर बसवून शाहपूर शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. गर्भवती महिलेचा पुराच्या पाण्यातून थरारक प्रवास सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे. तरी प्रशासनाकडून वेळीच दखल घेण्यात यावी अशी मागणी नेटकऱ्यांकडून होत आहे.
#WATCH | Madhya Pradesh: Villagers in Betul district carry a pregnant woman on a cot as they risk their lives while crossing a river to take her to a hospital in Shahpur town pic.twitter.com/l9e4XaQ27G
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) August 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)