Newborn Palestinian Baby Girl Rescue Video: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या दरम्यान, गाझा येथील ढिगाऱ्यातून एका नवजात बाळाला वाचवल्याचा हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. या मुलीच्या घरावर बॉम्बस्फोट झाल्यानंतर जवळजवळ 37 दिवसांनी या मुवीची ढिगाऱ्याखालून सुटका करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 24-सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर इस्रायलने बॉम्ब टाकलेल्या घराच्या ढिगाऱ्यातून नवजात बाळाला जिवंत वाचवलेले दिसते. गल्फ न्यूजच्या अहवालानुसार, युद्ध सुरू होण्याच्या काही दिवस आधी जन्मलेली पॅलेस्टिनी मुलगी, तिच्या कुटुंबाच्या घरावर बॉम्बस्फोट झाल्यानंतर सर्व अडचणींपासून वाचली. विशेष म्हणजे, सुरुवातीचे हल्ले सुरू झाल्यानंतर 37 दिवसांनी बाळाला वाचवण्यात आले. (हेही वाचा - Israel Boy Release From Hamas Prison: हमासच्या कैदेतून चिमुरड्याची सुटका; बाप-लेकाच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)