Israel Boy Release From Hamas Prison: इस्रायल आणि हमास यांच्यातील करारानुसार शुक्रवारी हमासच्या बंदिवासातून 13 इस्रायली नागरिकांची सुटका करण्यात आली. सोडण्यात आलेल्या इस्रायली नागरिकांमध्ये नऊ वर्षांचा मुलगा ओहद मुंदर आणि त्याची आई आणि आजी यांचा समावेश आहे. मुलाला स्नायडर मेडिकल सेंटरमध्ये नेले जात आहे. आता स्नायडर मेडिकल सेंटरने मुलाच्या कुटुंबाला भेटतानाचा व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ओहद त्याच्या वडिलांना पाहताच धावत जाऊन त्यांना मिठी मारतो. यावेळी वडिलांचा आनंदही दिसून येतो. कौटुंबिक भेटीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ओहदसोबत त्याची आई कॅरेन मुंडर (वय 55 वर्षे) आणि आजी रुती मुंडर (वय 78 वर्षे) यांचीही हमासच्या कैदेतून सुटका करण्यात आली आहे. ओहद यांचे भाऊ रॉय झिचेरी मुंडर यांनी इस्रायलच्या सर्व जनतेचे आभार मानले. (हेही वाचा - Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात चार दिवसांचा युद्धविराम; गाझामधील मृतांची संख्या 14,800 हून अधिक)
#WATCH | Israeli nationals who were released on November 24, after being held hostage by Hamas in Gaza, reunited with their families at Schneider Children's Medical Center in Israel.
(Source: Schneider Medical Centre) pic.twitter.com/CozLU3QnzU
— ANI (@ANI) November 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)