भारताच्या स्वातंत्र्य दिनादिवशी मंगळवारी मुंबईत एका हिंदू तरुणीसोबत हँग आउट केल्याच्या आरोपावरून, एका मुस्लिम तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात लाल शर्ट घातलेल्या व्यक्तीला जमावाकडून मारहाण होताना दिसत आहे. त्याचवेळी ही मुलगी जमावाला विरोध करत आहे, मात्र त्याचा काही उपयोग होत नाही. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, या मुलीने बुरखा घातला आहे व तिचे वय 16 वर्षे आहे. या घटनेत पीडित व्यक्तीला गंभीर दुखापत झाल्यानंतर त्याला रेल्वे स्थानकाबाहेर ओढले गेले. 'जय श्री राम' च्या घोषणा देत जमाव त्या व्यक्तीला केस आणि कॉलर पकडून बाहेर ओढत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. (हेही वाचा: मोठा अनर्थ टळला! जीममध्ये थोडक्यात बचावला तरुणाचा जीव; पहा नेमकं काय झालं?)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)