बेंगळूरू येथील एका व्यक्तीने ऑनलाइन ऑर्डर केलेल्या जेवणात चक्क जिवंत गोगलगाय आढळल्याची घटना समोर आली आहे. या व्यक्तीने फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीद्वारे सॅलडची ऑनलाइन ऑर्डर दिली होती. या सॅलडमध्ये त्याला जिवंत गोगलगाय आढळली आहे. त्याने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले, ‘स्विगी, हे इतरांसोबत घडू नये याची खात्री करण्यासाठी जे काही करता येईल ते करा... बेंगळुरूच्या लोकांनी याची नोंद घ्यावी.’ नऊ सेकंदांच्या या व्हिडिओ फुटेजमध्ये सॅलडने भरलेला एक वाडगा दिसतो, ज्यामध्ये काही भाज्या आहेत आणि त्यांच्यासोबत एक जिवंत गोगलगायही दिसत आहे. ही पोस्ट 15 डिसेंबर रोजी शेअर करण्यात आली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीने या पोस्टवर प्रतिक्रिया देत याची चौकशी केली जाईल असे म्हटले आहे. या व्यक्तीने Leon Grill या ठिकाणाहून ही ऑर्डर केली होती. (हेही वाचा: Dog Attack in Hyderabad Video: अपार्टमेंटच्या बाहेर भटक्या कुत्र्याचा 5 वर्षीय मुलावर हल्ला, चिमुरडा जखमी)
Never ordering from @LeonGrill ever again!@SwiggyCares do whatever you can to ensure this shit doesn't happen to others...
Blr folks take note
Ughhhhh pic.twitter.com/iz9aCsJiW9
— Dhaval singh (@Dhavalsingh7) December 15, 2023
Hi Dhaval. That is terrible. Please help us with the order ID, so we can look into it.
^Sai
— Swiggy Cares (@SwiggyCares) December 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)