Dog Attack in Hyderabad Video: हैदराबाद (Hyderabad)मधील दिलसुखनगर भागात रस्त्यावरील कुत्र्याच्या हल्ल्यात (Dog Attack) 5 वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या घटनेत हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. हा मुलगा त्याच्या अपार्टमेंटबाहेर इतर दोन मुलांसोबत खेळत होता. जेव्हा कुत्रे जवळ आले तेव्हा मुले घाईघाईने इमारतीच्या आत गेली. परंतु 5 वर्षांच्या मुलगा अडखळला. त्यानंतर कुत्र्याने लहान मुलावर हल्ला केला. दरम्यान, अपार्टमेंटमधील रहिवाशांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी कुत्र्यांना हुसकावून लावले. (हेही वाचा - Leopard Entered a Hospital in Nandurbar: बिबट्याचा रुग्णालयात प्रवेश, रुग्णांसह डॉक्टर आणि नागरिकांची भीतने गाळण (Watch Video))

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)