Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यातील शहादा (Shahada) तालुक्यातील डोंगरगाव (Dongargao) रोडवरील एका रुग्णालयात बिबट्याने प्रवेश (Leopard Entered In The Hospital) केला आणि उपस्थितांची भीतीने एकच गाळण उडाली. आदित्य मॅटर्निटी अँड आय हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. बिबट्याने रुग्णालयात अनपेक्षितपणे प्रवेश (Viral Video Of Leopard) केल्याने त्याची दहशत निर्माण झाली. परिसरातही तणाव आणि घबराट पाहायला मिळाली. खास करुन रुग्णालयात उपचार घेणारे, उपचारासाठी आलेले रुग्ण, डॉक्टर्स, कर्मचारी आणि रुग्णांचे नातेवाईक अशा सर्वांमध्येच भीतीचे वातावरण तयार झाले. दरम्यान, घटनेची माहिती पोलीस आणि वन विभागाला मिळाली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बिबट्याला पाहून कर्मचाऱ्याची बोबडी वळली
प्राप्त माहितीनुसार, रुग्णालयातील कर्मचाऱ्याने बिबट्याला पहिल्यांदा सकाळी पाहिले. रुग्णालयाची नियमीत साफसफाईकरत असताना त्याला एका कोपऱ्यातून गुरगुरण्याचा आवाज आला. त्यामुळे कर्मचाऱ्याने कुतुहलाने कोपऱ्यात जाऊन शोध घेतला असता दृश्य पाहून त्याची बोबडीच वळली. समोर एका कोपऱ्यात बिबट्या बसला होता. त्याने तातडीने ही माहिती रुग्णालय प्रशासनाला दिली. प्रसंगावधान राखत आणि प्राथमिक सुरक्षेचा उपाय म्हणून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी इमारतीचा मागचा दरवाजा बंद करुन बिबट्याला कोंडून ठेवले. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी वनविभागाशी संपर्क साधला. (हेही वाचा, Viral Video- Leopard Grabbing Chicken: ठाण्यातील घोडबंदर रोड येथे आढळला बिबट्या; कोंबडीला घेऊन पळाला (Watch))
वनविभागाचे रेस्क्यू ऑपरेशन :
रुग्णालयात बिबट्या आल्याची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने घटनेची नोंद घेतली. वन विभागाचे एक पथक रुग्णालयात दाखल झाले. या पथकाने बिबट्याला पकडले आणि त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडले. बिबट्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न बराच काळ सुरु होते. तोवर उपस्थितांमध्ये जोरदार भीती निर्माण झाली होती. शिवाय, बख्यांची गर्दी जमल्यानेही बिबट्या अधिकच चवताळला होता. (हेही पाहा, Leopard At Indurikar Maharaj Home Video: इंदोरीकर महाराजांच्या घरात घुसला बिबट्या, कुत्र्याला उचललं (Watch Video))
बिबट्यांचे मानवी वसाहतींमध्ये येणे नित्याचे
बिबट्यांचे मानवी वसाहतींमध्ये येणे आता नित्याचे झाले आहे. या आधीही मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, कोल्हापूर, नंदुरबार, चंद्रपूर अशा एक ना अनेक ठिकाणी बिबट्याने नागरि वस्तींमध्ये प्रवेश केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील अनेक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्येही कैद झाल्या आहेत.
व्हिडिओ
#WATCH | Maharashtra: A Leopard entered a hospital in Nandurbar Taluka of Shahada on Tuesday. The leopard was later rescued by the Forest Department. (12.12) pic.twitter.com/ArOTltCFXg
— ANI (@ANI) December 13, 2023
कुत्र्यांची शिकार
सांगितले जाते की, नागरी वस्तीत असलेले पाळीव किंवा भटके कुत्रे हे बिबट्यांचे लक्ष्य असते. या कुत्र्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने हे बिबटे नागरी वस्तीमध्ये प्रवेश करतात. काही प्रकरणांमध्ये या बिबट्यांनी नागरिकांवरही हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. ज्यामुळे बिबट्याबद्दल भीती बाळगली जाऊ लागली आहे. खास करुन शेतकरी वर्गामध्ये बिबट्यांबद्दल अधिक भीती पाहायला मिळते. शेतामध्ये काम करत असताना बिबट्या दबक्या पावलांनी येतो आणि हल्लाकरतो. त्यामुळे बिबट्यांच्या नागरी वस्तींमधील प्रवेशावर वन विभागाने उपाय शोधावा ही मागणी वाढते आहे.