आजकाल सोशल मिडियावर कोणत्या बातम्या व्हायरल होतील याचा काही नेम नाही. यातील अनेक बातम्या अशा असतात ज्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण असते, मात्र तरी लोक त्या पुढे पाठवत असतात. आताही अशीच एक बातमी व्हायरल होत आहे ज्यामध्ये सरकारकडून चक्क दारूची पाईपलाईन देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. यामध्ये नमूद केले आहे की, दारूचे सेवन करणाऱ्या लोकांसाठी पंतप्रधानांनी घरीच दारूची पाईपलाईन देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी खालील अर्ज 11 हजारांच्या डिमांड ड्राफ्टसह पंतप्रधान कार्यालयात जमा करायचा आहे. त्यानंतर 1 महिन्यांनी तुम्हाला घरीच दारूची पाईप लाईन मिळेल.

मात्र आता पीआयबीने या बातमीची पडताळणी केली व ही बातमी पूर्णतः खोटी असल्याचे समोर आले. पीआयबीने ट्वीट करत, अशा गोष्टींबाबत खूप जास्त आशा ठेऊ नका असे म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)