Toxic liquor Kills 14 in Amritsar: पंजाबमध्ये विषारी दारूमुळे मृत्यूची आणखी एक घटना समोर आली आहे. पंजाब पोलिसांनी मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक केली आहे. ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्या सर्व लोकांना अमृतसरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. मृतांपैकी बहुतेक जण गावातील वीटभट्टीवर काम करणारे कामगार होते. या घटनेनंतर कारवाई करत पंजाब पोलिसांनी बनावट दारू पुरवणाऱ्या मुख्य आरोपीसह पाच आरोपींना अटक केली आहे.
विषारी दारू प्यायल्याने आरोग्य बिघडले, त्यांना नीट बोलताही येत नव्हते. सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रभजीत सिंग याला अटक केली आहे. याशिवाय त्याच्या अन्य 5 साथीदारांना अटक केली आहे.
विषारी दारू पिऊन 14 जणांचा मृत्यू
#Amritsar pic.twitter.com/pnEIFahUZk
— NDTV (@ndtv) May 13, 2025
यापूर्वीही अशा घटना घडल्यात
पंजाबमध्ये विषारी दारू पिल्याने मृत्यूची ही पहिलीच घटना नाही, तर याआधीही विषारी दारू पिल्याने लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये संगरूरमध्ये विषारी दारू पिऊन सुमारे 21 जणांचा मृत्यू झाला होता. तर, 2020 मध्ये तरनतारनमध्ये विषारी दारू पिल्याने 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)