रेल्वे अधिकारी, पोलीस आणि इतर रेल्वे कर्मचारी वेळोवेळी त्यांच्या सतर्कतेमुळे रेल्वे स्थानकावर लोकांचे रक्षण करताना दिसले आहेत. याबाबतचे अनेक व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहेत. अशीच एक घटना मुंबईच्या दादर स्टेशनवर पाहायला मिळाली, जिथे एका टीसीने चालत्या लोकलमध्ये चढणाऱ्या एका व्यक्तीला रुळावरून घसरण्यापासून वाचवले. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

दादर स्टेशनवर ड्युटीवर असताना नागेंद्र मिश्रा नावाच्या वरिष्ठ तिकीट परीक्षकांना चालती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील जागेत एक प्रवासी पडताना दिसला. त्याचवेळी मिश्रा वेगाने पुढे सरकले आणि त्यांनी पडणाऱ्या तरुणाला ओढले, त्यामुळे त्याचा जीव वाचला. नागेंद्र मिश्रा यांचे धाडस आणि सतर्कता यामुळे एका व्यक्तीचे प्राण वाचू शकले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)