Green Shade Nets at Traffic Signals: सध्या देशभरात कडक ऊन अनुभवण्यास मिळत आहे. यामुळे नागरिकांची अवस्था बिकट होत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार एप्रिलमधील उष्णतेने गेल्या 100 वर्षांचा विक्रम मोडला आहे. मे महिन्यातही देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. या उष्णतेमुळे लोक बाहेर पडण्यास टाळाटाळ करतात आणि जे बाहेर पडतात त्यांची अवस्था फारच वाईट होते. यामध्ये लोकांना या उन्हामध्ये ट्रॅफिक सिग्नलवर ग्रीन लाईटची प्रतीक्षा करणे अक्षरशः जीवावर येते. या समस्येपासून लोकांना दिलासा देण्यासाठी पुद्दुचेरी पीडब्ल्यूडीने एक चांगला उपक्रम सुरू केला आहे. पुद्दुचेरी पीडब्ल्यूडीने ट्रॅफिक सिग्नलवर ग्रीन नेटचे छत घातले आहे, ज्यामुळे लोकांना उन्हापासून दिलासा मिळत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पुद्दुचेरीचा असल्याचा सांगण्यात येत आहे. यामध्ये लोक सिग्नलवर हिरव्या जाळीदार छताखाली दुचाकीसह ट्रॅफिक लाइट हिरवा होण्याची वाट पाहत असल्याचे दिसत आहे. (हेही वाचा: Heatwave in India: एप्रिल 2024 ठरला गेल्या 123 वर्षांतील सर्वात उष्ण; मोडला सरासरी किमान तापमानाचा विक्रम, मे महिन्यात 11 दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)