Fish Served Alive at Restaurant: जपानमधील रेस्टॉरंटमध्ये जेवणात वाढला जिवंत मासा, जाणून घ्या काय घडले पुढे (Watch Video)
व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, जेव्हा ग्राहकाला सॅलड आणि जेवण दिले जात होते तेव्हा त्यात एक मासा जिवंत होता.
सोशल मीडियावर जेवणाचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एका जपानी रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीला चक्क जिवंत मासा खायला दिला गेला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, जेव्हा ग्राहकाला सॅलड आणि जेवण दिले जात होते तेव्हा त्यातील एक मासा जिवंत होता.
रेस्टॉरंटने आपल्या प्लेटमध्ये जिवंत मासे दिले होते हे माहीत नसल्यामुळे, त्या माणसाने अन्न खाण्यासाठी जेव्हा चॉपस्टिक्सचा वापर केला तेव्हा प्लेटमधील जिवंत माशाची हालचाल दिसून आली. हा व्हिडीओ जुना असला तरी आत्ता तो व्हायरल होत आहे.
Fish served at restaurant bites chopstick😳 pic.twitter.com/PnkG6xt1Ig
— OddIy Terrifying (@OTerrifying) February 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 15, 2023 05:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

