Fact Check: आता अंत्यसंस्कार किंवा दफन करण्यासाठी द्यावा लागेल 18 टक्के GST? जाणून घ्या व्हायरल संदेशामागील सत्य

सोमवारपासून म्हणजेच 18 जुलैपासून जनतेला काही घरगुती वस्तू, हॉटेल आणि बँक सेवांसह इतर काही गोष्टींसाठी जास्त खर्च करावा लागेल.

Socially टीम लेटेस्टली|

सरकारने अलीकडेच अनेक वस्तूंच्या जीएसटी दरांमध्ये केलेल्या बदलांनंतर आता त्याचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. सोमवारपासून म्हणजेच 18 जुलैपासून जनतेला काही घरगुती वस्तू, हॉटेल आणि बँक सेवांसह इतर काही गोष्टींसाठी जास्त खर्च करावा लागेल. अशात एक बातमी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नमूद केले आहेक, स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार, दफन करणे किंवा शवागार सेवांवर 18 टक्के जीएसटी लागू केला जाईल. डॉ. धीमंत पुरोहित या व्यक्तीचे हे ट्वीट आहे. हे ट्वीट समोर आल्यानंतर याबाबत पीआयबीने स्पष्टीकरण दिले आहे. पीआयबीने म्हटले आहे की, अंत्यसंस्कार, दफन, स्मशानभूमी किंवा शवागार इथल्या सेवांवर कोणताही जीएसटी असणार नाही, तर स्मशानभूमीच्या कामाच्या कंत्राटांवर 18 टक्के जीएसटी लागू होईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
Close
Latestly whatsapp channel
Close
Latestly whatsapp channel