पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (25 एप्रिल) व्हॅटिकन सिटीला रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत केंद्रीय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू; अल्पसंख्याक व्यवहार आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन आणि गोवा विधानसभेचे उपाध्यक्ष जोशुआ डीसूझा आहेत. मुर्मू व्हॅटिकन सिटीच्या दोन दिवसांच्या भेटीवर आहेत आणि भारत सरकार आणि जनतेच्या वतीने शोक व्यक्त करतील. 26  एप्रिल दिवशी पोप फ्रांसिस वर अंत्यविधी होतील. या दिवशी भारतात दुखवटा पाळला जाणार आहे तसेच झेंडा अर्ध्यावर फडवला जाईल. नक्की वाचा: Pope Francis Passes Away: ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन; वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास .

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व्हॅटिकन सिटीच्या दोन दिवसांच्या भेटीवर

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)