सरकारच्या योजनांसंबंधी अनेक दावे सोशल मिडियावर केले जातात. त्यातले काही खरे असतात तर बरेच खोटे. आताही 'Yojna 4u' नावाच्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये केंद्र सरकार पॅनकार्ड असलेल्या सर्व महिलांना एक लाख रुपयांची रोख रक्कम देत असल्याचा दावा केला जात आहे. 'पत्नीकडे पॅनकार्ड असेल तर खात्यात 1 लाख रुपये रोख रक्कम येईल, मोठी संधी’, असा हा दावा आहे.
पीआयबीने या दाव्याची सत्यता तपासली असता, हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट केले की, ‘या व्हिडिओमध्ये केलेला दावा खोटा आहे. अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत स्त्रोतांवर अवलंबून रहा.’
'Yojna 4u' नामक यूट्यूब चैनल के एक वीडियो में दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार सभी पैन कार्ड धारक महिलाओं को ₹1,00,00 की नगद राशि प्रदान कर रही है#PIBFactCheck
▶️ इस वीडियो में किया गया दावा #फ़र्ज़ी है।
▶️ प्रमाणिक जानकारी के लिए कृपया आधिकारिक स्रोतों पर ही भरोसा करें। pic.twitter.com/Rl6NLZd5rR
— PIB Fact Check (@PIBFactCheck) March 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)