Man Boarded The Transformer: सोशल मीडियावर नवरा-बायकोच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही अतिशय गंभीर असतात. सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बायको माहेरी गेली म्हणून हा व्यक्ती थेट ट्रान्सफॉर्मरवर चढला. गावकऱ्यांनी त्याला खाली येणासाठी विनंती केली. परंतु, त्याने बायकोला बोलवा, अन्यथा खाली उतरणार नाही, असा तगादा लावला. ही घटना झाशी येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर या व्यक्तीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. (वाचा - Dentist Chopped Off Woman’s Lip: हैदराबादमधील डेंटिस्टने कापला महिलेचे ओठ; म्हणाला, 'आता तू छान दिसतेस')
पहा व्हिडिओ -
पत्नी मायके चली गई तो नाराज़ पति ट्रांसफ़ॉर्मर पर चढ़ गया. इसके बाद ज़िद पर अड़ गया कि मेरी बीवी को बुलाओ. मामला झांसी का है. pic.twitter.com/JOhQdfGiTe
— Priya singh (@priyarajputlive) February 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)