
Hyderabad Dentist Chopped Off Woman’s Lip: हैदराबादमधून (Hyderabad) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका डेंटिस्ट (Dentist) ने रुटीन चेकअपसाठी आलेल्या महिलेचे ओठ (Lip) कापला. या महिलेने तक्रार केल्यावर डॉक्टरने सांगितले की, आता तू आणखी चांगली दिसत आहे. खरं तर हे प्रकरण वैद्यकीय निष्काळजीपणाचे आहे. शहरातील एफएमएस क्लिनिकमध्ये काही दिवसांपूर्वी एका 28 वर्षीय तरुणाचा ॲनेस्थेसियाच्या ओव्हरडोजमुळे मृत्यू झाला होता. आता पुन्हा याच क्लिनिकमध्ये महिलेचा ओठ कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवर महिलेच्या खालच्या ओठाचा उजवा भाग कापला असल्याचे दिसत आहे. ट्विटरवर यासंदर्भात पोस्ट करताना सौम्याने सांगितले की, एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, परंतु माझी मैत्रीण अजूनही तिचे ओठ पूर्णपणे ताणू शकत नाही. तिला उघडपणे हसता येत नाही. तिच्या ओठांची लवचिकता परत आणण्यासाठी ती आता स्टिरॉइड्स घेत आहे. (हेही वाचा -Patient Chews Gutkha While on Hospital Bed in Kanpur : हॉस्पिटलच्या बेडवर पडून रुग्ण खातोय तंबाखू , व्हिडीओ व्हायरल)
सौम्याने सांगितले की, ही घटना ज्युबली हिल्स येथील त्याच एफएमएस हॉस्पिटलमध्ये घडली, जिथे नुकतेच ऍनेस्थेसियाच्या ओव्हरडोजमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. जेव्हा पीडितेच्या आईने गुगलवर हॉस्पिटलबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया दिली तेव्हा डॉक्टरांनी आश्वासन दिले होते की, तिच्या मुलीचे ओठ काही महिन्यांत बरे होतील. मात्र वर्षभरानंतरही डेंटिस्टच्या निष्काळजीपणाचे परिणाम त्याला भोगावे लागत आहेत. (हेही वाचा - Fake Beggars Arrested: पैशांसाठी अपंग असल्याचे नाटक; तोतया भिकाऱ्यांना ओडिशा पोलिसांकडून अटक (Watch Video))
At FMS Hospital in Jubilee Hills, where a patient passed away during dental procedure due to anesthesia overdose, one of my friends too had a horrific dental treatment experience there earlier. The dentist accidentally chopped off her lip, leaving a deep depression in her mouth. pic.twitter.com/43vt4fBcZF
— Sowmya Sangam (@sowmya_sangam) February 20, 2024
पीडित रुग्णाची आई जेव्हा आपल्या मुलीच्या उपचाराबद्दल रुग्णालयाच्या प्रभारींशी बोलली तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, ती पहिल्यापेक्षा चांगले दिसत आहे. यानंतर ते जोरजोरात हसू लागले. दरम्यान, 16 फेब्रुवारी रोजी हैदराबादच्या लक्ष्मी नारायण विंजम यांना FMS इंटरनॅशनल डेंटल क्लिनिकमध्ये ‘स्माइल डिझायनिंग’ शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. भूल देण्याच्या अतिसेवनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.