पैशांसाठी अपंगत्वाचे नाटक करुन भीक मागणाऱ्या तोतया भिकाऱ्यांवर ओडिशा पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांची बनवेगिरी उघड पाडली आहे. अजय कुमार, अनिल कुमार, मेरी आणि जशोबंत कुमार अशी आरोपींची नावे आहेत. चारही आरोपी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील आहेत. ते ओडिशामध्ये जाऊन भीक मागण्याचा धंदा करत होती. हे सर्व आरोपी बेरहामपूर महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यावर भीक मागत होते.
धक्कादायक म्हणजे हे सर्व आरोपी, गेल्या काही वर्षांपासून हे चौघेही दिव्यांगांच्या वेशात हातात काटी घेऊन भीक मागत आहेत. बुधवारी कामापल्ली चक येथे यातील दोघे भीक मागत असताना पोलिसांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. पोलिसांना संशय बळावला त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करुन चौकशी सुरु केली असता त्यांचा बनाव उघडकीस आला. पोलिसांनी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी मिळाली. (हेही वाचा, Bacche ko Pareshan Mat Karo says PM Modi: 'बच्चे को परेशान मत करो' जम्मूच्या थंडीत पंतप्रधान मोदींचं आवाहन (Watch Video))
व्हिडिओ
Faking disability for money! Fake Divyang beggars arrested in Odisha#Odisha pic.twitter.com/cqWLHwOixY
— OTV (@otvnews) February 21, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)