Odisha Shocker: भुवनेश्वर, ओडिशात, एका व्यक्तीने आपली पत्नी सुभाषश्रीला भूल देऊन तिला ठार मारले. आरोपीने आपल्या दोन मैत्रिणींच्या मदतीने पत्नीला जास्त प्रमाणात भूल दिली. फार्मासिस्ट प्रद्युम्न असे आरोपीचे नाव असून रोझी पात्रा आणि इजिता भुयान अशी त्याच्या दोन मैत्रिणींची नावे आहेत. पत्नीला ॲनेस्थेसियाचा उच्च डोस दिल्यानंतर प्रद्युम्नने तिला बेशुद्ध अवस्थेत जवळच्या रुग्णालयात नेले. रुग्णालयात त्याने डॉक्टरांना सांगितले की, पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मात्र, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये महिलेला भूल देण्यात आल्याची पुष्टी झाली आहे. यानंतर आरोपी आणि त्याच्या दोन मैत्रिणींना अटक करण्यात आली. हे देखील वाचा: UP Shocker: उत्तर प्रदेशात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, पोलिसांकडून कारवाई

येथे जाणून घ्या, अधिक माहिती 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)