Dinner On The Runway: नुकतेच 14 जानेवारी रोजी गोवा ते दिल्ली इंडिगो फ्लाइटला सुमारे 18 तास उशीर झाला आणि नंतर ते मुंबईकडे वळवण्यात आल्याची बातमी समोर आली होती. विमानाला उशीर झाल्यामुळे इंडिगो फ्लाइटच्या सहवैमानिकाला प्रवाशाने मारहाण केल्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर, काही तासांनंतर सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये प्रवासी विमानाच्या शेजारी रात्रीचे भोजन करताना दिसत आहेत. विलंबामुळे निराश झालेल्या इंडिगो 6E2195 फ्लाइटच्या प्रवाशांनी इंडिगो विमानाच्या शेजारी बसून रनवेवर विश्रांती घेण्याचे आणि रात्रीचे जेवण करण्याचा निर्णय घेतला. X वर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये काही प्रवासी जेवण करताना दिसत आहेत, तर काही प्रवासी धावपट्टीवर विश्रांती घेत आहेत. (हेही वाचा: Couple Romance On Bike Video: चालत्या दुचाकीवर पांघरुनाआडून चाळे, पोलिसांकडून युगुलावर कारवाई)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)