राजधानी दिल्ली येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक दुचाकीस्वार अत्यंत चुकीच्या पद्धतीने दुचाकी हाकतो आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, दुचाकीस्वार अत्यंत चुकीच्या पद्धतीने वाहनांना ओव्हरटेक करतो आहे. तसेच, त्याच्या पाठीमागे वाहनावर बसलेली व्यक्ती उलट्या दिशेने बसली आहे. एका व्यक्तीने या प्रसंगाचा व्हिडिओ चित्रीत करुन दिल्ली पोलिसांच्या ट्वीटर हँडलला तो टॅग गेला आहे. सोशल मीडियावर उपलब्द माहितीनुसार, ही घटना दिल्लीतील मंगोलपुरी जवळ आऊटर रिंग रोड फ्लायओव्हर परिसरात रविवारी (16 जुलै) सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास घडली. दिल्ली पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास सुरु केला आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)