Aliens in Brazil: जगभरात एलियनबाबतचे गूढ अजूनही कायम आहे. याआधी अनेक लोकांनी एलियन पहिल्याचा दावा केला होता, मात्र याबाबतचे ठोस पुरावे समोर आले नाहीत. आता पुन्हा एकदा काही लोकांनी एलियन पाहिल्याचा दावा केला आहे. त्याचा व्हिडिओही त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या लोकांचा असा दावा आहे की, त्यांनी दोन विचित्र प्राणी पाहिले, ज्यांना ते एलियन मानत आहेत. एलियन्स पाहिल्याचा दावा करणारे हे लोक हायकर्स आहेत. हे लोक ब्राझीलमध्ये राहतात. त्यांना टेकडीच्या माथ्यावर उभे असलेले रहस्यमय प्राणी दिसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते या मनुष्यासारखे दिसणाऱ्या प्राण्याची उंची साधारण 10 फुट असावी. ब्राझीलमध्ये याआधीही लोकांनी एलियन पाहिल्याचा दावा केला आहे. 1996 सालची एक घटनाही खूप चर्चेत आहे. वर्गिन्हा येथे यूएफओ पाहिल्याचा दावा करण्यात आला होता. (हेही वाचा: Cow Dung as Rocket Fuel: जगात प्रथमच गायीच्या शेणाचा वापर करून उडवले रॉकेट; जपानला अवकाश क्षेत्रात मोठे यश)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)