Snake Viral Video: साप हा सर्वात धोकादायक सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी एक आहे. सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातचं आता सोशल मीडियावर आणखी एक क्लिप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सर्प मित्र एका किंग कोब्राला रेस्क्यू करताना दिसत आहे. भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, 'निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अन्नसाखळीत किंग कोब्रा महत्त्वाचा आहे. येथे सुमारे 15 फूट लांबीच्या एका किंग कोब्राला वाचवण्यात आले आणि जंगलात सोडण्यात आले. संपूर्ण ऑपरेशन प्रशिक्षित सर्प मित्राने पार पाडले. कृपया तुम्ही हे करू नका. पाऊस सुरू झाल्यावर, ते विविध ठिकाणी आढळू शकतात.'

व्हिडिओमध्ये एक प्रशिक्षित सर्पमित्र 15 फूट लांबीच्या कोब्राला काठीचा वापर करून वाचवताना दिसत आहे. या सापाला वाचवल्यानंतर जंगलात सोडण्यात आले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Viral Video: चालत्या ट्रेनसमोर इन्स्टाग्राम रील बनवणं 16 वर्षीय मुलाला पडलं महागात; ट्रेनच्या धडकेत गमवावा लागला जीव)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)