आजच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली. आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघेंबाबत उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले, त्यांनी (उध्दव ठाकरे) यांनी आनंद दिघेंचे पाय कापले. तसेच दिघे यांच्या मृत्यूनंतर दिघे साहेबांनी कसा पक्ष वाढवला, संघटना कशी वाढवली असे विचाराल असे वाटले होते, मात्र त्यांनी मला दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे? आणि कोणाच्या नावावर आहे? असे प्रश्न विचारले.
आनंद दिघेंबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंवर मोठा आरोप
- (उध्दव ठाकरे) यांनी आनंद दिघेंचे पाय कापले*
- दिघे यांच्या मृत्यू नंतर मला सगळ्यात पहिली गोष्ट यांनी विचारली - "दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे ? आणि कोणाच्या नावावर आहे ?
(*म्हण) pic.twitter.com/ArT2ExV3m4
— Kamlesh Sutar (@kamleshsutar) October 5, 2022
दिघे साहेबांनी कसा पक्ष वाढवला, संघटना कशी वाढवली असं तुम्ही विचाराल असं वाटलं. पण तुम्ही मला आनंद दिघे साहेबांची प्रॉपर्टी विचारली. #विचारांचेवारसदार
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)