Maharashtra Assembly Elections 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात 706 कोटी 98 लाख रुपयांची मालमत्ता जप्त

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण १० हजार १३९ तक्रारी प्राप्त झाल्या.

Maharashtra Assembly Elections 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात 706 कोटी 98 लाख रुपयांची मालमत्ता जप्त
ECI | File Image

Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण १० हजार १३९ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १० हजार १३४  तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. यासह राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. (हेही वाचा: Maharashtra Assembly Elections 2024: पुण्यात ट्रान्सजेंडर गट 'शिखंडी ट्रस्ट'चा मतदानावर बहिष्कार, जाणून घ्या कारण)

निवडणुकीच्या काळात 706 कोटी 98 लाख रुपयांची मालमत्ता जप्त-

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 20, 2024 11:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).