पनवेल-खालापूर रोड वरील माडप बोगद्याजवळ ट्रकने धडक दिल्याने अपघातग्रस्त झालेल्या विनायक मेटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मेटे यांच्यावर एमजी रूग्णालयात उपचार सुरू होते पण मदत वेळेवर मिळू न शकल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनावर राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पहा विनायक मेटेंसाठी श्रद्धांजलीपर ट्वीट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गेल्याच महिन्यात त्यांचा वाढदिवस साजरा झाला. अगदी या आठवड्यात सुद्धा मंत्रालयात विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली होती आणि आज काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले.
ॐ शान्ति 🙏
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 14, 2022
पंकजा मुंडे
दुर्दैवी अपघातात निधन झाल्याने विनायकराव मेटे सारख्या सतत चळवळीत काम करणार्या नेत्याला महाराष्ट्र मुकला.त्यांना 22-23 वर्ष पाहते आहे कुठल्याही पारिवारिक पार्श्वभुमी विना राजकारणात स्वतःच्या बुद्धी आणि कौशल्य च्या जीवावर उभा असणारा मराठा चळवळीतील नेता हरपला.भाव पूर्ण श्रद्धांजली.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) August 14, 2022
रोहित पवार
शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (५२) यांचा झालेला अपघाती मृत्यू हा धक्कादायक आणि अत्यंत दुःखद आहे. #मराठा आरक्षणाच्या लढ्यात त्यांचं मोठं योगदान होतं. या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळावी, अशी मी प्रार्थना करतो!
भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/Idh1ULIgrB
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 14, 2022
राजेश टोपे
मराठा समाजातील एक धडाडीचे नेतृत्व, शिवसंग्रामचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. बीड जिल्ह्यातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या निधनाने मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आग्रही असणारे नेतृत्व हरपले आहे. pic.twitter.com/z7L9qmKZMi
— Rajesh Tope (@rajeshtope11) August 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)