मुंबई वाहतुक पोलिसांनी सांगितले आहे की, 22 एप्रिल रोजी एमएमआरडीएन मिलिंद नगर, जेव्हीएलआर येथे कॉंक्रीट रस्त्याचे दुरुस्ती काम सुरु असल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना JVLR येथील मार्ग टाळा असा निर्देश देण्यात आला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांकडून नागरिकांसाठी पर्याय मार्ग उपलब्ध करण्यात आला आहे. मुंबई वाहतुक पोलिसांनी ट्वीटरवर यासंर्भात अधिकृत माहिती दिली. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील मिलिंदनगर येथील पुलाच्या आपत्कालीन व अत्यावश्यक देखभालीच्या कामामुळे उत्तर व दक्षिणवाहिनी अशा दोन्ही मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

जाणून घ्या पर्यायी मार्ग

1.पूर्व द्रुतगती महामार्ग 2. पश्चिम द्रुतगती महामार्ग 3. अंधेरी-घाटकोपर लिंक रोड 4. साकी विहार रोड 5. एम.आय.डी.सी. सेंट्रल रोड 6. हिरानंदानी लिंक रोड 7. सांताक्रुज चेंबुर लिंक रोड 8. सायन-बांद्रा लिंक रोड

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)