पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिर्डी, अहमदनगर येथे आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू यासारख्या क्षेत्रातील सुमारे 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी केली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, ‘साईबाबांच्या आशीर्वादाने 7500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली जात आहे. महाराष्ट्र ज्या निळवंडे धरणाची 5 दशकांपासून वाट पाहत होता, त्या निळवंडे धरणाचे कामही पूर्ण झाले आहे. मी भाग्यवान आहे की मला येथे 'जलपूजन' करण्याची संधी मिळाली.’

ते पुढे म्हणाले, ‘आमचे सरकार ‘सबका साथ सबका विकास’ या मंत्राचे पालन करत आहे. आपल्या दुहेरी भारत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य गरीबांचे कल्याण आहे. आज देशाची अर्थव्यवस्था वाढत असताना गरिबांच्या कल्याणासाठी सरकारचे बजेटही वाढत आहे. आज महाराष्ट्रात 1.10 कोटी आयुष्मान कार्ड दिले जात आहेत. आयुष्मान भारत योजनेंतर्गत गरिबांवर मोफत उपचार केले जात आहेत. आम्ही पीएम किसान सन्मान निधी सुरू केला, ज्याच्या मदतीने देशभरातील कोट्यावधी लहान शेतकर्‍यांना 2 लाख 60 हजार कोटी रुपये दिले आहेत. तसेच 26,000 कोटी रुपये महाराष्ट्रातील छोट्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात आले आहेत.’ भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले, ‘महाराष्ट्र हे अफाट क्षमता आणि शक्यतांचे केंद्र आहे. महाराष्ट्राचा विकास जितक्या वेगाने होईल तितक्या वेगाने भारताचा विकास होईल. पंतप्रधान मोदींनी मुंबई आणि शिर्डीला जोडणाऱ्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखविल्याचे स्मरण केले आणि महाराष्ट्रात रेल्वेचे जाळे सतत विस्तारत असल्याचे अधोरेखित केले. (हेही वाचा: Maratha Aarakshan: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोलीत एका तरूणाची गळफास घेत आत्महत्या)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)